आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनावरील लस या वर्षी उपलब्ध होणे अशक्य, परिणामकारकता व सुरक्षिततेची खातरजमा नंतरच लस बाजारात : सिरम

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध होईपर्यंत चाचण्या करत राहणे हा एकमेव उपाय

कोरोनाची लस उपलब्ध करण्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत, मात्र या वर्षात कोरोनावरील लस उपलब्ध होणे शक्य नाही. परिणामकारकता आणि सुरक्षितता यांची खातरजमा होईपर्यंत लस बाजारात आणण्याची घाई किमान आम्ही तरी करणार नाही, अशी स्पष्ट माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी मंगळवारी दिली.

मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स बरोबरच्या भागीदारीतून स्वयंचलित आरटी पीसीआर चाचण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणाचे अनावरण मंगळवारी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आले. यावेळी सिरमचे संस्थापक डॉ. सायरस पुनावाला, अदर पुनावाला, मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल तसेच डॉ. शैलेंद्र कवाडे उपस्थित होते. यावेळी आदर पुनावाला यांनी कोरोना प्रतिबंधक लस व भारतातील कोरोना तपासणी चाचण्यांची सद्य:स्थिती याबाबत आपले विचार मांडले.

पुनावाला म्हणाले, जोपर्यंत करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणारी लस किंवा औषध सापडत नाही तोपर्यंत अधिकाधिक वैद्याकीय चाचण्या करणे हेच उद्दिष्ट असायला हवे. देशातील सध्याच्या चाचण्यांची संख्या अत्यल्प असून आपण पुरेश्या चाचण्यांच्या जवळपासही अद्यााप पोहोचलेले नाहीत . कोणाची चाचणी करावी व कोणाची नाही याबाबत अद्याापही शासनाचे निर्बंध आहेत. लक्षणे नसलेल्या व्यक्तीकडून संसर्ग पसरण्याचा धोका मोठा आहे, ही बाब विचारात घेऊन चाचण्यांबाबतचे धोरण बदलण्याची गरज आहे.

चाचण्या करत राहणे एकमेव उपाय

लस उपलब्ध होण्याबाबत पुनावाला म्हणाले, लस निर्मितीतील सर्व टप्पे काळजीपूर्वक पूर्ण करून, त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच लस बाजारात येईल. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. देशातील व जगातील नागरिकांसाठी परिणामकारक, सुरक्षित असेल अशीच लस आम्हाला आणायची आहे, ती आणण्यासाठी कोणतीही घाई नाही, किमान सहा महिने तरी त्यासाठी लागतील, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले. कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध होईपर्यंत चाचण्या करत राहणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे अधिकाधिक व वेगवान चाचण्या करणे ही काळाची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...