आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा सावकारी करणे आले अंगलट:पुण्यात दाम्पत्यास अटक; महिलेने व्यवसायासाठी 15 % व्याजाने घेतले होते 6 लाख रुपये

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदा सावकारी करणाऱ्या दाम्पत्यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम निवृत्ती पोकळे (वय 43) आणि त्याची पत्नी हेमा उर्फ रेखा (वय 36, दोघे रा. धायरी,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

सदरील तक्रारदार महिला धायरी भागात राहायला आहे. आरोपी पोकळे तिच्या ओळखीचे आहेत. महिलेने व्यवसायासाठी आरोपींकडून 15 टक्के व्याजाने सहा लाख 45 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर मे 2022 पर्यंत महिलेने व्याजापोटी पोकळे यांना नऊ लाख 45 हजार रुपये दिले. महिलेच्या मैत्रिणीने पोकळे यांच्याकडून साडेपाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने त्यांना व्याजापोटी सात लाख 32 हजार रुपये परत केले.

त्यानंतर पोकळे यांनी समजुतीचा करारनामा करुन त्यांच्याकडून मुद्दल आणि व्याजापाेटी 18 लाख 83 हजार रुपयांची मागणी केली. पैसे परत न केल्यास सदनिकेचा ताबा घेण्यात येईल, असे समजुतीच्या करारनाम्यात लिहून घेतले. महिला तसेच तिच्या मैत्रिणीला पोकळे यांना धमकावले. दंडापोटी पोकळे यांनी दोघींकडे 21 लाख 39 हजार रुपये मागितले. सदनिकेचा ताबा घेण्यासाठी त्यांना धमकावले. अखेर महिलेने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन पोकळे दाम्पत्याला अटक केली.

बेकरीत बसलेल्या व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील 80 हजारांची रोकड आणि तीन मोबाइल असा 89 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 1 नोव्हेंबरला रात्री सव्वा नउच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात असलेल्या न्यू मार्शल बेकरीत घडली. जहिरद्दीन अन्सारी (वय 49 रा. कोंढवा,पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी यांची संतोषनगर परिसरात बेकरी आहे. 1 नोव्हेंबराला रात्री नउच्या सुमारास ते दुकानात बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी अन्सारी यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यांच्याकडील 80 हजारांची रोकड आणि तीन मोबाइल असा 89 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...