आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#couplechallenge:पुणे पोलिसांचा इशारा - जोडप्यांनी सोशल मीडियावर फोटो टाकण्यापूर्वी दोन वेळा करावा विचार, फोटो मॉर्फ्ड करुन पोर्न बनवण्यात होऊ शकतो वापर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी इशारा देत एक पोस्टरही ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहे

सोशल मीडियावर सध्या कपल चॅलेंजचा ट्रेंड सुरू आहे. यूजर्स आपल्या बेटर हाफची फोटोज फेसबुकवर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुरू झालेले हे चॅलेंज प्रचंड लोकप्रिय झाले आहे. फेसबुक सुरू केले की, कपल चॅलेंजचे फोटोज समोर येत आहेत. याच काळात पुणे पोलिसांनी या ऑनलाइन मोहिमविषयी इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर कपलने फोटो टाकण्यापूर्वी अनेक वेळा करावा असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. असामाजिक लोक या फोटोंचे मॉर्फ बनवू शकतात आणि ते अश्लील आणि इतर सायबर गुन्ह्यांसाठी वापरू शकतात. पुष्टी न झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 2 दशलक्षाहूनही अधिक लोकांनी कपल चॅलेंज स्वीकारले आहे.

पोलिसांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्टर शेअर करत लिहिले की, 'आपल्या पार्टनरचा फोटो शेअर करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. जर तुम्ही सतर्क राहिला नाहीत तर एक 'क्यूट' चॅलेंज तुमच्यासाठी अडचणीचे ठरु शकते.' या मॅसेजसोबत एक पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. यावर लिहिले आहे की, 'कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल चॅलेंज होईल...' तसेच पुढे म्हटले की, 'या फोटोंचा वापर मॉफिंग, बदला घेणे, पोर्न आणि सायबर क्राइमसाठी केला जाऊ शकतो'

या कपल चॅलेंजचा विरोध करणेही सुरुच आहे
हे चॅलेंज कुणी सुरू केले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियावर अने लोक आपल्या पार्टनरसोबतचे रोमँटिक फोटोज शेअर करत आहेत. ज्यांना हे चॅलेंज आवडलेले नाही ते सोशल मीडियावर राग व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...