आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:परिस्थिती परीक्षा घेते तेव्हा जिद्द निर्माण होते, सूर्यदत्त पुरस्कार विजेत्या नमिता कोहोक यांचे मत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या केमोथेरपीवेळी पहिली कंपनी सुरू झाली. जोखीम घ्यायला आवडते. जोखमीशिवाय यश मिळत नाही, यावर विश्वास आहे. जेव्हा परिस्थिती परीक्षा घेते तेव्हाच जिद्द निर्माण होते, याचा प्रत्यय आला. सौंदर्य स्पर्धेमध्ये उतरले आणि क्राऊन मिळाला. कर्करोगपीडित महिलेत काय ताकद असणार, असे म्हटले गेले तेव्हा पॉवर लिफ्टिंगला सुरुवात केली, दोन वेळा सुवर्णपदक पटकावले,’ असे कर्करोगपीडित पहिल्या “मिसेस ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन २०१८’ डॉ. नमिता कोहोक यांनी केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कोहोक बोलत होत्या. या वेळी त्यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते “मिसेस सूर्यदत्त २०२२’ व “सूर्यभूषण २०२२’ या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील उपस्थित होते. प्रा. चोरडिया म्हणाले, मुलांनी यातून शिकायला हवे व ठामपणे वाटचाल करायला हवी.”

बातम्या आणखी आहेत...