आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी युद्ध:आयुष मंत्रालय, सीएसआयआरकडून ‘कोविड-19 कवच अॅप’ची निर्मिती

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयुर्वेदिक उपचारासाठी दररोज लक्षणांचे निरीक्षण, रिअल टाइम डेटा

कोरोनाला आळा व निरीक्षणासाठी पुण्यात आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांच्या मार्गदर्शनात “कोविड कवच’ या अॅपची निर्मिती झाली आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आयोजित “इंजिनिअरिंग एक्सलन्स अवॉर्ड’चे विजेते दिमाख सहस्रबुद्धे यांनी हे अॅप डिझाइन व विकसित केले आहे.

संचालक डॉ. अरविंद चोप्रा यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले हे अॅप आयुष मंत्रालय आणि सीएसआयआर यांच्या औषध अभ्यास चाचणीसाठी वापरले जात आहे. चोप्रा यांच्या टीमद्वारे कोविड - १९ च्या आयुर्वेदिक उपचारासाठी या अॅपचे परीक्षण करून दररोज लक्षणांचे निरीक्षण आणि नैदानिक चाचणीत ‘रिअल टाइम डेटा’ प्रदान करत आहे. दिमाख सहस्रबुद्धे यांनी या अॅपचे डिझाइन व विकसन ६ आठवड्यांमध्ये पूर्ण केले आहे. अॅपधारकांत कोरोनाची काही लक्षणे दिसत आहेत का किंवा दिलेल्या औषधांचे काही विपरीत परिणाम दिसत आहेत का, याचे निरीक्षण या अॅपद्वारे करण्यात येत आहे. या अॅपमध्ये ७ सोपे प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे अॅपधारक व अभ्यासक यांच्यात रोजचा संपर्क राहतो. सहस्रबुद्धे म्हणाले, हे अॅप आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाच्या दृष्टीने जरी बनवलेले असले तरी अन्य कोणत्याही वैद्यकीय शाखेअंतर्गत कोविड - १९ किंवा अन्य कोणत्याही फुप्फुसाच्या संसर्ग उपचारासाठी उपयुक्त ठरू शकते.

अशी आहेत ‘कोविड कवच’ अॅपची वैशिष्ट्ये

१ या अॅपद्वारे कोरोना रुग्णांवर पाळत (ट्रॅक) ठेवणे सोपे होते. औषधोपचाराची नियमावली सुधारता येऊ शकते.

२ पूर्णपणे गोपनीयता. एका कोडद्वारे सहभागी ओळखला जातो. अन्य वैयक्तिक माहिती मागितली जात नाही.

३ लवकरात लवकर कोरोनाबाधित रुग्णांचे निदान करणे अाणि त्यांना आवश्यक उपचार देणे शक्य होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...