आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Covid Infected Woman Falls From The 8th Floor In The Wake Of Running Away From The Hospital At Pune, Died After Falling From A Height

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातील घटना:​​​​​​​रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रयत्नात 8 व्या मजल्यावरुन पडली कोविड संक्रमित महिला, रुग्णालयात जाताना झाला मृत्यू

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंघोळीच्या बहाण्याने बाथरुममध्ये गेली होती दिप्ती

पुण्याच्या ससून जिल्हा रुग्णालयात दाखल एक कोरोना पॉझिटिव्ह महिला पळून जाण्याच्या प्रयत्नात आठव्या मजल्यावरुन कोसळली. वरुन पडल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच उपचारांसाठी जात असताना महिलेचा मृत्यू झाला. महिलेचे नाव दिप्ती काळे (42) असे आहे. महिला ही वकील होती. या प्रकरणात पुण्याच्या बंद गार्डन पोलिस स्टेशनमध्ये अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिप्तीला तिचा साथी निलेश शेलारसोबत विश्रामबाग पोलिसांनी सर्राफा व्यावसायिक बलवंत मराठे यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि धमकावण्याच्या आरोपात अटक केली होती. वसूली टोळीची प्रमुख असल्याचेही सांगितले गेले होते.

अंघोळीच्या बहाण्याने बाथरुममध्ये गेली होती दिप्ती
कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर दिप्तीला ससून रुग्णालयाच्या कोविड वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी ती बाथरुममध्ये गेली आणि खूप वेळ बाहेरच आली नाही. गार्डला ती अंघोळीला जात असल्याचे सांगून गेली होती.

सुरुवातीच्या तपासात अंदाज लावला जात आहे की, तिने खिडकीच्या काचला स्लाइड करुन पाइपने उतरण्याचा प्रयत्न केला आणि पाय घसरल्यामुळे ती 8 व्या मजल्यावरुन कोसळली. दरम्यान सध्या तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...