आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:‘कोविशील्ड’ लसीची पुण्यात मानवी चाचणी, भारती हॉस्पिटलमध्ये दोन स्वयंसेवकांना दिली लस

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीची पुण्यात भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दोन स्वयंसेवकावर चाचणी घेण्यात आली. “कोविशील्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस या स्वयंसेवकांना देण्यात आली. ही लस दिल्यानंतर या स्वयंसेवकांच्या शरीरात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करून २८ दिवसांनंतर त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी एकूण पाच स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार होती. परंतु तीन जणांच्या अहवालात अँटिबॉडीज आढळून आल्याने त्यांना यापूर्वी नकळत कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. त्यांना ही लस देण्यात आली नाही.

या वैद्यकीय चाचणीसाठी भारती हॉस्पिटल व सीरम इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये सहकार्य करार झालेला आहे. या संशोधनासाठी सीरम इन्स्टिट्यूट हे मुख्य प्रायोजक असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) हे सहप्रायोजक आहेत. भारती हॉस्पिटल येथे मुख्य अन्वेषक म्हणून डॉ. संजय ललवाणी हे काम पाहणार आहेत.

भारती हॉस्पिटल गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून लहान मुलांच्या लसीच्या संशोधनासाठी सीरम इन्स्टिट्यूट व वेगवेगळया संस्थांबरोबर काम करत आहे. संशोधनासाठी वेगळा विभाग कार्यरत असून डॉक्टर्स, संशोधक, सोशल वर्कर यांची टीम कार्यरत आहे. ही लस दिलेल्या स्वयंसेवकास पुढील सहा महिने निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

देशात १४ केंद्रांवर चाचणी
देशातील १४ केंद्रांत या लसची मानवी चाचणी होणार असून एकूण १,६०० जणांना, तर भारती हॉस्पिटल येथे एकूण ३५० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील निरोगी स्त्री–पुरुष यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे.

{ स्वयंसेवकाची निवड करताना प्रथमतः त्यांची कोविड आरटीपीसीआर व अँटिबॉडी तपासणी होईल. { या सर्व चाचण्या निगेटिव्ह असलेल्या स्वयंसेवकास लस देण्यात येणार आहे. { भारती हॉस्पिटलसह ससून रुग्णालय, जहांगीर रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात कोरोना लस दिली जाईल. २८ दिवसांच्या निरीक्षणानंतर पुन्हा दुसरा डोस देणार

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser