आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:कोविशील्डच्या 4 कोटी लसी तयार, 1600 कार्यकर्त्यांवर प्रयाेग सुरू

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटने आता कोरोनावर विकसित केलेल्या ‘कोविशील्ड’ या लसीच्या तिस-या टप्प्यातील मानवी चाचणी प्रक्रियेेत भारतीय वैद्यकिय आयुर्विज्ञान परिषद (आयसीएमआर) बरोबर भागिदारी केली आहे. तसेच नोवावॅक्स या कोरोनावर लस निर्मिती करणा-या कंपनीकडून ‘कोविवॅक्स’ या लसीची निर्मिती करण्यात येत असून या चाचणी प्रक्रियेतदेखील सिरमने कंपनीशी भागिदारी केली आहे. ‘कोविशील्ड’ची तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मानवी चाचणी देशातील १५ ठिकाणी होत आहे. यासाठी पुण्यासह देशभरातून स्वयंसेवकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी केली आहे. त्यांच्यावर ही चाचणी करण्यात येत आहे.

आतापर्यंत सर्वात विश्वसनीय ऑक्सफर्डची लस कोविशील्डच्या चार कोटी लसी तयार करण्यात आल्या आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व आयसीएमआरने प्रयोगासाठी १६०० कार्यकर्त्यांची निवड केली. त्याशिवाय लसीचा प्रयोग ब्रिटन, अमेरिका, ब्राझील व दक्षिण आफ्रिकेतदेखील सुरू आहे. आयसीएमआर क्लिनिकल ट्रायलमधील परीक्षण स्थळासंबंधी खर्च करणार आहे. सीरम इतर खर्च भागवत आहे. आतापर्यंतच्या प्रयोगात कोविशील्डने सकारात्मक परिणाम दिला असून हाच कोरोना महामारीवरील प्रभावी उपाय ठरू शकतो, असे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...