आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:नर्सवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा; पहिले लग्न झाले असल्याचे लपवून केला अत्याचार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धमकी देत नर्सवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला विवाह झाला असतानादेखील नर्स तरुणीला तिची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा झाल्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन देऊन हा डॉक्टर तिच्यावर बलात्कार करत व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत होता. डॉ. शशिकांत शामराव सोरटे (३९, रा. शिवाजीनगर, गणेशखिंड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुण्यातील रहिवासी असून नर्स म्हणून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. तर आरोपी डॉक्टर आहे. आरोपी डॉक्टर आणि पीडित तरुणीची ओळख २०११ मध्ये ती काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये झाली होती. नर्सिंगबरोबर ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत होती. याच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने २०१६ ते जानेवारी २०२१ दरम्यान आपल्या प्रेमात अडकवून तिला आपण तुझी यूपीएससीची परीक्षा झाल्यावर लग्न करणार आहे, असे खोटे आश्वासन दिले.

याच दरम्यान त्याने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, तिने त्याला विरोध केला असता त्याने तिला मारहाणदेखील केली. तसेच त्याच्याकडे असलेल्या व्हिडिओ क्लिपची भीती दाखवून तिला ब्लॅकमेल करून शशिकांतने तिला आपले यापूर्वीच लग्न झाल्याचे सांगितले नाही. तसेच त्याला पहिल्या लग्नापासून मूल असल्याचे सांगितले नाही. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करताना, त्याने तिला पूर्वी लग्न झाल्याची कोणतीही कल्पना दिली नाही.

तसेच पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवले. दरम्यान, तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन शशिकांतविरोधात बलात्कार, विनयभंग, मारहाण तसेच धमकावल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीच्या वतीने अॅड. सिद्धार्थ घोडके यांनी बाजू मांडली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. जमदाडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...