आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गुन्हेगारी वाढली:मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या; विनापरवाना पिस्तूल बाळगणारा अटकेत

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या दोघा आरोपीना गुन्हे शाखेच्या युनीट सहाने चतुःशृंगी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 11 हजारांचा अमली पदार्थ जप्त केला.विराज इंद्रकांत छाडवा (वय 32 रा. पांडवनगर,पुणे) , जयेश भारत कोटियाना (वय 20 रा. टिंगरेनगर,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पांडवनगर परिसरात दोघेजण मेफेड्रॉन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने विराज आणि जयेशला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 ग्रॅम मेफेड्रॉन, दोन मोबाइल, स्वयंचलित वजनी काटा असा ऐवज जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.

विनापरवाना पिस्तूल बाळगणारा अटकेत

विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला युनीट सहाने येरवडा परिसातून अटक केली आहे. त्याच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले. राहुल रोहिदास जाधव (वय 31 रा. लक्ष्मीनगर, येरवडा ,पुणे)असे अटक केलेल्याचे नाव आहे.येरवडा परिसरातून हिंदू स्मशानभूमीजवळ एकजण पिस्तूल बाळगून थांबल्याची माहिती युनीट सहाला मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपी राहुल जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूलासह काडतुस जप्त केले. अधिक चौकशीत आणखी दोन पिस्तूल आणि दोन काडतुस जप्त करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिली आहे.

सराईत पिस्तूलासह जेरबंद

खूनाच्या प्रयत्नातील फरार सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व 8 जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. विशाल सज्जन फाळके (वय 30, रा. येरवडा,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट एकचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खूनाच्या प्रयत्नातील फरारी महानगरपालिका भवनाजवळ आल्याची माहिती पोलीस अमलदार नीलेश साबळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विशालला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल व 8 जिवंत काडतूसे जप्त केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...