आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आली आहे. आता पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. यासोबतच धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरामध्ये वाहनांना बंदीही घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर नागरिक प्रचंड गर्दी करत होते. येथे कोरोना नियमांचे पालनही केले जात नव्हते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच अशा गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने आता येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे.
देशासह राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नुकतीच ओसरली आहे. यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले. मात्र याचा फायदा घेत पर्यटक पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी करत आहे. यावेळी पर्यटक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत नाहीत, तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नसते. अशा वेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरु शकते. यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू केले आहे. पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.
या ठिकाणी असणार आहेत निर्बंध
भुशी डॅम, घुबड तलाव, तुंगाली डॅम, लोणावळा डॅम, वलवण डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, वेहेरगाव, टायगर पॉइंट, अमृतांजन ब्रिज, एकविरा मंदीर परिसर, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरामध्ये जमावबंदी असणार आहे. यासोबतच पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि पोहण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच धबधब्याखाली उभे राहणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी येणे अशा गोष्टींना येथे बंदी आहे. यासोबतच धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहने लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.