आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरचा आहेर:पायी जाणारे मजुरांचे जथ्थे भूषणावह नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा राज्य सरकारला घरचा आहेर

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • अधिकारी योग्य ठिकाणी नियुक्त करणे मुख्यमंत्र्यांचे काम

काेराेनामुळे लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. मात्र, वाहतुकीची साधने नसल्याने रस्त्याने पायी जाणारे जथ्थे दिसतात. ही बाब महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यास भूषणावह नाही. मजुरांना ज्याप्रकारे वागवण्यात येत आहे ही घाेडचूक असून त्यांना घरी पाठवण्यासाठी पैसे वाचवण्याचा प्रकार चुकीचा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मजुरांचे याेगदान असून राज्यात काम करणारी ही यंत्रणा माेडकळीस येता कामा नये. पुढील काळात एमआयडीसीजवळ वसाहती निर्माण करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आयाेजित आॅनलाइन व्हिडिआे काॅन्फरन्सिंग चर्चासत्रात चव्हाण म्हणाले, जीएसटीनंतर राज्य सरकारचे उत्पन्न स्रोत कमी झाले आहे. पेट्राेल-डिझेलचा वापर घटल्याने कर मिळत नाही, दारूवरील उत्पादन कर मिळत नाही. वाहने विक्री बंद असल्याने ताे कर उपलब्ध नाही, घर खरेदी-विक्री हाेत नसल्याने स्टॅम्प ड्युटी मिळत नाही. अशा परिस्थितीत उत्पन्नाचे नवीन स्राेत निर्माण केले पाहिजेत. पेन्शन, पगार, कर्जावरील व्याज या गाेष्टी थांबवता येणार नाहीत. त्यामुळे विकासकामांना पुढील काळात कात्री लावावी लागणार आहे. उपलब्ध निधीचा वापर करून आराेग्य आणि शिक्षण खाते सक्षम करणे महत्त्वाचे ठरेल, असे चव्हाण म्हणाले.

अधिकारी योग्य ठिकाणी नियुक्त करणे मुख्यमंत्र्यांचे काम

राज्यातील प्रत्येक विभागात ५ लाख लाेकसंख्येपर्यंतची आैद्याेगिक महानगरे विकसित करणे गरजेचे असून ती कामे करण्यात कल्पक नेतृत्वाची कमतरता दिसून येते. महाराष्ट्र सरकारने माझा सल्ला घेतला असता तर, काही वरिष्ठ आयएएस अधिकारी कामाविना बसून असून काहींना दुसऱ्या खात्याची ही कामे दिल्याचे दिसून येते. याबाबत केवळ सचिवांना दाेष देऊन काही हाेणार नाही तर राज्यकर्त्यांनी बदल करणे आवश्यक आहे. चांगले प्रशासकीय अधिकारी याेग्य ठिकाणी नियुक्त करणे हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे, असे चव्हाण म्हणाले

बातम्या आणखी आहेत...