आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:"दादा परत या’; कोथरूडकरांनी घातली चंद्रकांत पाटील यांना पोस्टरमधून साद, खोचक टोमणा कसा मारावा किंवा एखाद्याचा पाणउतारा कसा करावा हे पुणेकरांना चांगलेच माहीत आहे

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे तेथे काय उणे ! एखाद्याला खोचक टोमणा कसा मारावा किंवा एखाद्याचा पाणउतारा कसा करावा हे पुणेकरांना चांगलेच माहीत आहे. सर्वसामान्य व्यक्ती असो की राजकारणी, अस्सल पुणेकर कुणालाच त्याच्या वाणीतून सोडत नाही. असाच अनुभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर येथे प्रचारात व्यग्र असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याने येथील काही स्थानिकांनी ‘चंद्रकांत दादा हरवले आहेत, जेथे असाल तेथून परत या’ असे पोस्टर लावले आहे. या पोस्टरची चर्चा पुण्यात रंगली आहे.