आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात त्याच वेळी युतीचे सरकार आले असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही उरले नसते. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण हाेती की अन्यायाविरुद्ध लढून जिंका. आमच्यावरील अन्यायावर दाेन-तीन चित्रपट काढावे लागतील. धर्मवीरांचे कार्य जनमानसात पाेहोचवणे काही जणांना रुचले नाही. आम्ही निघून गेल्यावर राजकीय आत्महत्या केल्याची टीका केली जात हाेती. अाम्ही गद्दार असताे तर राज्यातील जनेतेने आम्हाला समर्थन दिले असते का, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवड (ता. पुरंदर) येथील शेतकरी जनसंवाद मेळाव्यात बोलताना केला. या वेळी माजी मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार शहाजीबापू पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद साेनवणे, दिलीप लांडे, आमदार भीमराव तापकीर, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व्यासपीठावर उपस्थित हाेते.
सरकार बदलले आहेे... शिंदे म्हणाले, शासन लाेकांपर्यंत संवाद साधण्यासाठी आपण नाशिक, औरंगाबाद आणि पुणे विभागात प्रत्यक्ष जाऊन आढावा बैठक, अतिवृष्टी झालेल्या शेतीचे नुकसान, जनावरे हानी, जीवितहानी, घरांची पडझड, इतर विषय याबाबत आढावा घेत आहोत. त्यातून अनेक विषय समाेर आले आहेत.
आघाडी मान्य नव्हती २०१९ च्या निवडणुकीत सेना-भाजपने एकत्रित काम केले. बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा फाेटाे लावून आपण निवडणुका लढल्या. जनतेने आपणास काैल दिला. वाटले हाेते की, युतीचे सरकार स्थापन हाेईल. परंतु दुर्दैवाने महाविकास अाघाडीचे सरकार स्थापन झाले. सर्वांना हे मान्य नव्हते.
जेजुरी गडाला भेट देणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री पुणे | राज्यातील राजकीय घडामाेडींनंतर मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पुरंदर मतदारसंघात शिंदे यांनी मंगळवारी दुपारी जाहीर सभेस उपस्थित लावली. त्यानंतर जेजुरी गडास भेट देऊन त्यांनी मंदिरात दर्शन घेतले. प्रथमच जेजुरी मंदिरात भेट देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली आहे. मंदिराच्या समाेरील माेठ्या कासवाच्या प्रतिकृतीवर हळदीचा पिवळा भंडारा, खाेबरे उधळण्यात आले. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांना घाेंगडी व फेटा देऊन स्वागत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.