आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Dagdushet Halvai Ganpati Aarti Pune | Anuradha Paudwal, Prasad Oak Took Darshan Dagdushet Halvai Ganpati | Former Minister Jankar Performed The Aarti

दगडूशेठ हलवाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी:अनुराधा पौडवाल, प्रसाद ओक यांनी घेतले दर्शन; माजी मंत्री जानकर यांनी केली आरती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यासोबतच प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनीही पत्नीसह दगडूशेठचे दर्शन घेतले. राज्यात कालपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, मोठ्या धूमधडाक्यात घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. तर माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आरती करत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज दर्शन घेतले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना असल्याने राज्यासह देशाची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. कोरोनामुळे सर्वत्र निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून गणेशोत्सव हा म्हणावा तसा झाला नव्हता. मात्र, कोरोनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते प्रसाद ओक आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी दर्शन घेतले.

आरोग्य चांगले राहूदे

दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेते प्रसाद ओक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मागची 2 वर्षे सगळ्यांची फार बिकट गेली खूप अवघड परिस्थितीत गेली. यावर्षी सगळे सुरळीत झाले असून बाप्पाचे आशीर्वाद आहे. सगळ्यांचे आरोग्य चांगले राहूदे आणि आशीर्वाद राहूदे अशी प्रार्थना केली."

सामूहिक अथर्वशीर्ष पठण

ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 31 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ 1 च्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 35 वे वर्ष होते.

बातम्या आणखी आहेत...