आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव विघ्नहर्त्या बाप्पाचा!:पुण्यात दगडूशेठ गणपतीला 130 किलो आईस्क्रीमचा मोतीचूर लाडूचा नैवैद्य

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी गणेशोत्सवात अनेक भाविक विविध प्रकारचे नैवैद्य अर्पण करत असतात. अशाचप्रकारे प्रसिध्द किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे व व्यापारी गणेश गोसावी यांनी गणपतीला मोतीचूर बुंदीचा 130 किलोचा आईस्क्रीमचा लाडू अर्पण केला.

लाडू बनवायला लागले 5 ते 6 दिवस

किरण साळुंखे म्हणाले, पाच ते सहा दिवसांच्या परिश्रमाने हा आईस्क्रीमचा लाडू बनवण्यात आला आहे. आईस्क्रीमचा प्रसाद गणपतीला अर्पण केल्यानंतर तो भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. हा मोतीचूर बुंदीचा 130 किलोचा आईस्क्रीम प्रसाद बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य लागले आहे. कोरोना काळामुळे उत्सव होई शकला नव्हता. परंतु यंदा जल्लोषात गणेशोत्सव होत आहे. दरवर्षी आमचा दगडूशेठ गणपतीला काहीतरी वेगळे करण्याचा संकल्प असतो. त्यानुसार यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे उत्सवाचे 130 वे वर्ष असल्याने 130 किलोचा मोतीचूर मिश्रित आईस्क्रीम प्रसात बनवण्यात आला.

संस्कृती बालगुडेने घेतले दर्शन

दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट दूर झाल्यावर आपण गणपती उत्सव पूर्वीप्रमाणे साजरा करतो आहे याचा आनंद कायम आहे, अशी भावना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने व्यक्त केली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर तिने प्रेक्षकांना शुभेच्छा देताना सांगितले की, दरवर्षी मी सहकुटुंब दगडूशेठ गणपती, मंडई गणपतीस येत असते. दोन वर्ष आपल्याला गणेशोत्सवाची उणीव भासली. मात्र, आता कोरोनाचे संकट दूर झाले असून, यावर्षी गणेशोत्सव सगळीकडे आनंदाने साजरा केला जातो आहे.

पुण्यास सायन्स सिटी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. केसरकर म्हणाले की, नवीन सरकार निवडून आल्याने आता माध्यमातून खूप चांगले काम होण्यासाठी दगडूशेठ गणपती बाप्पाचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या मागे राहतील. महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवशाली घडू दे, पुणे हे विद्देचे माहेरघर आहे. लवकरच याचे सायन्स सिटी करण्याचा आमचा विचार आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी केसरकर आले होते , त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.

बातम्या आणखी आहेत...