आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला आरास:दगडूशेठ गणपती मंदिरात 21 हजार सूर्यफुलांची आरास, वसंतऋतूच्या स्वागतासाठी गणरायाला अभिषेक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे. चैत्र महिन्यात वसंतऋतूच्या स्वागतासाठी दगडूशेठ गणपतीला सूर्यफूलांची आरास करण्यात आली.

मंदिरात आकर्षक सजावट

यावेळी मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे मंदीर परिसर आणखीनच उठून दिसत होता. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे व सकाटा सीड इंडिया कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली.

पहिल्यांदाच दगडूशेट गणपतीला सूर्यफूलांची आरास करण्यात आली.
पहिल्यांदाच दगडूशेट गणपतीला सूर्यफूलांची आरास करण्यात आली.
कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.
कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.

सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो.फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे.ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात.

मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती.
मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती.
चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी एका जपानी कंपनीकडून ही सजावट करण्यात आली.
चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी एका जपानी कंपनीकडून ही सजावट करण्यात आली.