आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सोमवारपासून खुले, मंदिरावर आकर्षक सजावट

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर शिखरापासून विविधरंगी पणत्यांच्या भव्य प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून मंदिरे खुले करण्याच्या दिलेल्या निर्णयाचे मंदिर व्यवस्थापनाने स्वागत केले असून भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज असणार आहे.

दिवाळीनिमित्त मंदिरावर १०८ विविधरंगी भव्य पणत्या, २१ झुंबरे लावण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. मंदिराच्या दरवाजावर व संपूर्ण संरक्षक भिंतीवर फुलांची आकर्षक आरास व तोरणदेखील लावण्यात आले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून मंदिरे व सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी दिल्याने आम्ही सोमवारपासून भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहोत. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतची मंदिर प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. मास्क, सॅनिटायझेशन, डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच सभामंडपात बसण्याची परवानगी नाही. शासनाने दिलेल्या निर्णयामुळे भक्तांचा पाडवा गोड झाला असल्याचे त्यांनी सांगितले.