आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:तीन तासांत 3 हजारांहून चपात्या बनवणारे मशीन दगडूशेठ ट्रस्टकडून ‘ससून’ला भेट

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने पुण्यातील ससून रुग्णालयातील किचन विभागाला अत्याधुनिक चपाती मशिन भेट देण्यात आले आहे. ३ तासात तब्बल ३ हजारहून अधिक चपात्या या मशिनद्वारे तयार होणार आहेत. आजमितीस ससून रुग्णालयात दरराेज १,२९६ रुग्णांना दोन्ही वेळेचे सकस जेवण विनामूल्य उपलब्ध दिले जाते. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ही सेवा अखंडपणे देत आहे.

राजाराम अंबाजी मराठे व सुमती राजाराम मराठे यांच्या स्मरणार्थ गणेशभक्त सतीश मराठे यांच्या पुढाकाराने हे नवीन मशीन देण्यात आले आहे. चपाती मशीनचे पूजन करुन या मशिनच्या प्रत्यक्ष वापराला नुकतीच सुरुवात झाली. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

डॉ. विनायक काळे म्हणाले, मशिनवर चपाती तयार होत असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होत आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने यापूर्वी देखील चपाती मशिन किचनकरिता मिळाले होते. आता तीन मशीन किचनमध्ये कार्यरत आहेत. मशीनवर चपात्या तयार होत असल्याने स्वच्छता राखण्यास आणखी मदत होत आहे. तसेच भोजनाची गुणवत्ता देखील उत्तम दिली जात आहे.

१२९६ रुग्णांना दररोज दोन्ही वेळेचे भोजन याप्रमाणे दररोज सुमारे ३ हजार जणांना भोजन, चहा, नाश्ता दिले जाते. याकरिता एकूण २४ स्वयंपाकी व सहायक कार्यरत असून उत्तम व सकस भोजन सेवा विनामूल्य देणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या खंबीर पाठिंब्यामुळे शक्य होत आहे. सन २०१३ पासून हा प्रकल्प आजपर्यंत अखंडपणे सरूु असून हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...