आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला:श्री स्वानंदेश रथातून निघणार 'दगडूशेठ' ची सांगता मिरवणूक; बाप्पाची मिरवणूक पाहा घरबसल्या ऑनलाईन

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! या जयघोषात गणेश भक्त उद्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. तसचे पुण्यातील सुप्रसिद्ध असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवारी (09 सप्टेंबर) थाटामाटात निघणार आहे.

हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी रथ सजणार

यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला आहे.

स्वानंदेश रथावर 8 खांब उभारणार

श्री स्वानंदेश रथावर 8 खांब साकारण्यात आले आहे. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 24 फूट इतकी आहे. रथावर 5 कळस बसवण्यात आले आहेत. एलईडी व मोतिया रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ साकारण्यात आला आहे. त्यामध्ये विविध रंगाचे एलईडी लाईटस् देखील वापरण्यात आले आहे. दाक्षिणात्य पद्धतीची रचना हे यंदाच्या रथाचे वैशिष्टय आहे. संपूर्ण रथावर तब्बल 14 शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या 5 कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले आहेत.

'जय गणेश स्वच्छता अभियान रथ

सांगता मिरवणुकीत अग्रभागी देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन असणार आहे. त्यामागे पुण्यातील जगप्रसिद्ध व महत्वाच्या ठिकाणाची चित्रे असलेला व स्वच्छतेचा संदेश देणारा 'जय गणेश स्वच्छता अभियान रथ' असणार आहे. त्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते हिंजवडी आयटी पार्क पर्यंत आणि श्री कसबा गणपती मंदिरापासून ते पाताळेश्वर लेण्यांपर्यंतची चित्रे लावण्यात आली आहेत.

गणेशभक्तांचा मोठया संख्येने असणार सहभाग

पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरता ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असून याविषयी अधिकाधिक जनजागृती केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत स्व-रूपवर्धिनी पथक, दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड आणि केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यांचा समूह असा लवाजमा असेल. पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

बाप्पाची मिरवणूक घरबसल्या पाहा आनलाईन

यंदा दगडूशेठ गणपती गणेशोत्सव सांगता मिरवणूक घरबसल्या लाईव्ह पहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक जगभरातून घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी भाविकांनी मिळणार आहे. देश -परदेशातील भाविकांना देखील या सांगता मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा असते, मात्र, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे यंदा संपुर्ण सांगता मिरवणूक ट्रस्टची वेबसाईट http://www.dagdushethganpati.com यावरून भाविकांना घरबसल्या लाईव्ह पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...