आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यफुलांचा अभिषेक:"दगडूशेठ’ला 21 हजार सूर्यफुलांची आरास

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो. त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मंगळवारी करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती. ही आरास सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने करण्यात आली होती.