आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅरमंट खाती प्रकरण:हरियाणातील काॅर्पाेरेट कंपनीचे 100 काेटी हडपण्याचा हाेता कट

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेतील पाच डाॅरमंट खात्यांतील २१६ काेटी २९ लाख रुपये लंपास करण्याचा कट पुणे पाेलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. संबंधित खाती ही मुंबई, हरियाणा, चेन्नई, हैदराबाद, पुणे आदी शहरांतील हाेती. हरियाणामधील ग्लोबल मार्केटिंग या कंपनीची डाॅरमंट बँक खात्यात तब्बल १०० काेटींपेक्षा अधिक रक्कम हाेती आणि ती हडपण्याचा कट आराेपींनी काही बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने रचल्याची बाब पाेलिस तपासात समाेर आली आहे.

ज्या बँक खात्यातून आराेपी पैसे इतरत्र वळवणार हाेते त्या माेठ्या व्यावसायिक कंपनीच्या पाच खातेधारकांना पुणे पाेलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने शुक्रवारी लेखी पत्र पाठवले. संबंधित बँक खात्यांबाबत माहितीची विचारणा केली आहे. सदर गुन्ह्यातील आराेपींच्या संपर्कात असलेली स्टाॅक ब्राेकर अनघा माेडक ही बँकेच्या डाॅरमंट खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या काही जणांच्या संपर्कात हाेती. गाेपनीय डाटा मिळवून सायबर हॅकर्सच्या मदतीने संबंधित निष्क्रिय बँक खात्यातील पैसे इतरत्र वळवण्यासाठी ती अर्थिक अडचणीत असलेल्या माेठ्या व्यावसायिकांना संपर्क साधत होती. या व्यवहारात हाेणाऱ्या डीलसाठी तिला कमिशन म्हणून अडीच काेटी रुपये पाहिजे हाेते व त्यातून तिला तिची कोट्यवधी रुपयांची देणी फेडायची हाेती, असेही तपासामध्ये स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आले आहे.

बँकांतील डॉरमंट खाते (निष्क्रिय खाती) गाेपनीय माहितीच्या डेटा लीक प्रकरणात आराेपींनी पाच काॅर्पाेरेट बँक खाती लक्ष्य केली हाेती. यामध्ये देशातील व परदेशातील काॅर्पेरेट हाऊसच्या सीएसआर बँक खात्याचा समावेश होता. बँक खाती हॅक करून २१६ काेटी ३९ लाख ३४ हजार रुपये इतर खात्यांवर वळवण्याचा कट पुणे सायबर पाेलिसांनी मंगळवारी उघडकीस आणला. याप्रकरणी आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हैदराबाद, गुजरातमध्ये पुणे पोलिसांनी ठोकला तळ
हैदराबाद, सुरत, मुंबई, लातूर, आैरंगाबाद या ठिकाणी पुणे पाेलिसांची पथके तपासकामी रवाना झाली असून ती आणखी काही जणांचा शाेध घेत आहेत. यासोबतच गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आराेपींच्या घरझडतीत लॅपटाॅप, हार्ड डिस्क, माेबाइल, पेनड्राइव्ह असा इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला असून त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. हैदराबाद आणि गुजरात या ठिकाणी पाेलिस पथके गुन्ह्यातील आराेपींचा शाेध घेण्यासाठी आणखी काही दिवस थांबण्याची शक्यता असल्याचे पाेलिस सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...