आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमपीएससी' पूर्व परीक्षेची तारीख जाहीर:एकूण 800 पदांकरिता होणार भरती; ऑक्टोबमध्ये पेपर, 15 जुलैपर्यंत करता येईल अर्ज

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएस्सी)च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट-ब पूर्व परीक्षेची तारीख गुरुवारी घोषित करण्यात आली आहे. एकूण 800 पदांकरिता ही भरती होणार असून आठ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी 15 जुलै पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

78 पदे भरली जाणार

परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी- 42 पदे, राज्य कर निरीक्षक - 77 पदे, पोलिस उपनिरीक्षक - 603 पदे, दुय्यम निंबधक/मुद्रांक निरीक्षक - 78 पदे भरली जाणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता डिसेंबर 2022 किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. संबंधित परीक्षेच्या जाहिरातीत विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत. संर्वगातील पदसंख्या व आरक्षात शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्या व आरक्षात बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेत करण्यात येणार आहे.

तीन टप्प्यात होणार परीक्षा

महिला, खेळाडू तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार राहणार आहे. महिलांसाठी आरक्षण पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जात न चुकता महाराष्ट्रचे अधिवासी व नॉन क्रिमिलेअर मध्ये मोडत असल्याचा स्पष्ट दावा करणे आवश्यक आहे. संबंधित परीक्षा तीन टप्प्यात होणार असून पूर्व परीक्षा 100 गुणांची, मुख्य परीक्षा 400 गुणांची तर फक्त पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शारिरिक चाचणी 100 गुणांची व मुलाखत 40 गुणांची असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...