आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफी पेढीमध्ये चोरी:खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या दोन महिला अटकेत, दत्तवाडी पोलिसांची कारवाई

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 50 हजारांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून सराफी पेढीत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ज्योत्स्ना सूरज कछवाय (वय 31, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी,पुणे) आणि भाग्यश्री चंद्रकांत जेऊर (वय 29, रा. भारतनगर, कात्रज,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

दत्तवाडी भागातील एका सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने कछवाय आणि जेऊरने 50 हजारांचे मंगळसूत्र लांबविले होते. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. पुणे-सातारा रस्त्यावर दोघी थांबल्या होत्या. दोघींनी सराफी पेढीत चोरी केल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे पाटील यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून दोघींना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघींनी दत्तवाडी तसेच सांगवी परिसरातील सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविल्याचे उघड झाले. कछवाय विरोधात सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी केल्या प्रकरणी यापूर्वी 22 गुन्हे दाखल झाले आहेत. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खाेमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, राजू जाधव, अमित सुर्वे आदींनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...