आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेबांना मटण मला चिकन आवडते:फुकट बिर्याणी मागवणाऱ्या पुण्यातील पोलिस उपायुक्ताची फोन रेकॉर्डिंग लीक! गृहमंत्री म्हणाले- गंभीर विषय, चौकशीचे आदेश काढले

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ती ऑडिओ क्लिप मीसुद्धा ऐकली, हा खूप गंभीर प्रकार आहे - दिलीप वळसे पाटील

पुण्यातील महिला पोलिसाची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हयारल होत असताना दिसत आहे. या क्लिपमुळे सध्या पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. यामध्ये पुणे पोलिस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करत आहे. ही फुकट बिर्याणीची मागणी करणारी ऑडियो क्लिप महिला पोलिस अधिकारीला चांगलीच महागात पडणार असे दिसत आहे. कारण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील या ऑडिओ क्लिपची दखल घेतली आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र पुणे पोलिसांकडून या क्लिपविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या ऑडियो क्लिपवर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 'ती ऑडिओ क्लिप मीसुद्धा ऐकली, हा खूप गंभीर प्रकार आहे.' यानंतर गृहमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना याबाबतची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच यानंतर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पोलिस उपायुक्त महिलेने पोलिस कर्मचाऱ्याकडे केलेल्या या मागणीची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

त्या ऑडियो क्लिपमध्ये काय म्हणत आहेत महिला पोलिस?
महिला पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांच्यातील संभाषणाची जवळपास पाच मिनिटांची ही ऑडियो क्लिप आहे. यामध्ये डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत असल्याचे दिसत आहे. त्यांना हे सगळे एका चांगल्या हॉटेलमध्ये आणायचे आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नसले पाहिजे असे त्या म्हणतात. त्याचबरोबर त्याची चव चांगली असायला हवी अशी फर्माइशही त्यांनी केली आहे. या डीसीपी मॅडमनी फक्त ऑर्डर दिली नाही तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केला आहे. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणले असल्याचे सांगत आहे. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावताना या क्लिपमध्ये दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...