आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा संधी नाही:आरटीईच्या प्रवेशासाठी आता १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ, प्राथमिक शिक्षण संचालनालयाची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी | पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १५ मे २०२३ ही अंतिम मुदतवाढ सोमवारी जाहीर केली आहे. यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ८ मे (सोमवार) ही तारीख देण्यात आली होती. मात्र, या विहित मुदतीत राज्यभरातून फक्त ४८ हजार १२ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. म्हणजेच तब्बल ५३ हजार ८३४ जागा अद्याप रिक्त आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरुपाची असते. एकाचवेळी लाखो पालकांनी लॉगइन केल्याने सुरुवातीला प्राथमिक शिक्षण विभागाच्या आरटीई लिंकला तांत्रिक स्वरुपाचे अडथळे आले आणि पालकांच्या संतापालाही तोंड द्यावे लागले. तांत्रिक तक्रारींवर उपाय म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पर्यायी लिंक उपलब्ध केली तसेच बिघडलेल्या सर्व्हरसाठी उपाययोजना केली. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. ‘आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मात्र पालकांच्या वाढत्या मागणीचा मान राखून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. यापुढे कोणतीही मुदत दिली जाणार नाही. ज्या जागा रिक्त राहतील, तिथे प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेश दिला जाईल, असे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

आरटीईची आजची स्थिती घ्या जाणून...

  • राज्यभरातून ३ लाख, ६६ हजार, ५४८ अर्ज
  • गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ८९ हजार अर्ज वाढले
  • राज्यात उपलब्ध जागा १ लाख, १ हजार, ८४६
  • राज्यात उपलब्ध शाळांची संख्या ८ हजार, ८२८
  • दाखल अर्ज ३ लाख, ६४ हजार, ४१३
  • लॉटरीनंतर ९४ हजार ७०० बालकांचे प्रवेश जाहीर
  • प्रत्यक्षात ४८ हजार १२ बालकांचे प्रवेश निश्चित
  • आजवर ४८ हजार बालकांचे प्रवेश निश्चित

या शहरातील स्थिती अशी
छत्रपती संभाजीनगर -
आरटीई शाळांची संख्या ५४७, रिक्त जागा ४०७३, अर्ज २० हजार, ८९०
अहमदनगर - आरटीई शाळांची संख्या ३६४, रिक्त जागा २८२५, अर्ज ९ हजार ८१८
जळगाव - आरटीई शाळांची संख्या २८२, रिक्त जागा ३१२२, अर्ज ११ हजार ३१७
नाशिक - आरटीई शाळांची संख्या ४०१, रिक्त जागा ४८५४, अर्ज २२ हजार, १२२