आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 500 शेळ्या मेंढ्यांना विषबाधा:20 मेंढ्यांचा मृत्यू; प्लॅस्टिक आणि फेकून दिलेली पत्ता गोबी खाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील देहू जवळील तळवडे येथे जवळपास 500 शेळ्या मेंढ्यांना विषबाधा झाली असून 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 12 जूनला घडली असून मेढ्यांनी प्लॅस्टिक आणि फेकून दिलेला पत्ता गोबी खाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. सध्या इतर आजारी मेढ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी गुरुवारी सांगितले आहे.

या घटनेनंतर जिल्हा परिषदेने याची दखल घेत फिरता पशुवैद्यकीय दवाखाना पाठवला असून उपचार सुरू आहेत. तळवडे येथे सासवड आणि बारामती येथील शेतक-यांनी त्यांच्या जवळपास 500 शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी माळराणावर सोडल्या होत्या. यावेळी त्यांनी काही तरी खाल्याने त्यांना अचानक त्रास होऊ लागला. विषबाधा होऊन 20 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना 12 जूनला घडली. दरम्यान, या घटनेची माहिती जिल्हा परिषदेला मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पशूसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांच्या मार्फत फिरते पशूवैद्यकीय दवाखाना पाठवला. तेथील डॉक्टरांनी तातडीने इतर आजारी मेढ्यांवर उपचार सुरू केले. यामुळे त्यांची प्रकृती आता स्थि आहेत.

दरम्यान, या मेंढ्यांनी माळराणावरील विषारी गवत खाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत मेंढ्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला असून त्यात मेंढ्यांनी टाकून दिलेले पत्ता कोबी आणि प्लॅस्टिक खाल्याचे आढळलेले आहे. हेच त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...