आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृतांची वाढती संख्या:पुणे शहरात मृत्यूचा कहर सुरूच, एका दिवसात पाच जणांचा बळी

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
सुसाट धावणाऱ्या कार, माल वाहतकूीचे ट्रक,एसटीची वर्दळ असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लॉकडाऊनमुळे अक्षरश: सुनसान झाला आहे. त्याचे ड्रोनने टिपलेले छायाचित्र. - Divya Marathi
सुसाट धावणाऱ्या कार, माल वाहतकूीचे ट्रक,एसटीची वर्दळ असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लॉकडाऊनमुळे अक्षरश: सुनसान झाला आहे. त्याचे ड्रोनने टिपलेले छायाचित्र.
  • गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 63 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

शहरात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील २४ तासांत आणखीन पाच जणांचा मृत्यू झाला अाहे, तर नवीन ६३ काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून अाले अाहेत. त्यामुळे किमान शहरातील हा मृत्यूचा कहर पाहून तरी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आजारी असल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. आपल्यामुळे आपले कुटुंब, परिसर आणि शहराला बाधा पोहोचू नये या जाणिवेतून नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३४, ३८, ४९, ६३ आणि ७३ वयोगटातील पाच पुरुषांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ४३ वर जाऊन पोहोचली आहे. मृतांचा वाढता आकडा धडकी भरवणारा असून ही वाढणारी संख्या कमी कशी होईल, प्रादुर्भाव कसा कमी होईल यासाठी प्रशासनाकडून दिवस-रात्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्‍तीला मंगळवारी श्‍वसनाचा त्रास होत असल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना लठ्ठपणाचा त्रास होता. त्यामुळे त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. पर्वती गाव येथे राहत असलेल्या ३८ वर्षीय व्यक्‍तीला १० एप्रिलला रुग्णालयात दाखल केले. त्यांना हृदय स्पंदनांचा वेग कमी झाल्याचा आजार होता. त्यामुळे मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसेच गोखलेनगर परिसरातील ६३ वर्षीय आणि भवानी पेठेतील ७३ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांना १३ एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यातील ७३ वर्षीय व्यक्‍तीचा किडनीचा त्रास होता, तर दुसऱ्या व्यक्‍तीला मायोकॅडिटीसचा त्रास होता. त्यामुळे बुधवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पर्वती येथील ४९ वर्षीय व्यक्तीचा मधुमेह अाणि न्युमाेनियामुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

अंडी विक्रेत्याला काेराेना, १८० जण क्वॉरंटाइन

पिंपरी-चिंचवड शहरातील भाेसरी येथे राहणारा अाणि जुन्नर, खेड, चाकण परिसरात मेदनकरवाडी, नाणेकरवाडी येथे अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला काेराेनाची लागण झाल्याची बाब उघडकीस अाली अाहे. त्यामुळे खळबळ उडाली असून ८५ अंडी विक्री करणारे किरकाेळ विक्रेत्यांसह १८० जणांना क्वॉरंटाइन करण्यात अाले अाहे. चाकण नगरपालिकेने तत्काळ परिसरातील सर्व चिकन, अंड्यांची दुकाने बंद केली असून या हाेलसेल अंडी विक्रेत्याने काेणाकाेणाला अजून अंडी विक्री केली अाणि काेणाच्या संपर्कात अाला हाेता याचा शाेध घेण्यात येत अाहे. यासाेबत अंडी विक्रेत्याच्या कुटुंबातील सदस्यांचेही स्वॅब नमुने अाराेग्य विभागाने घेऊन तपासणीसाठी पाठवले अाहेत.

गर्भवती काेराेना रुग्ण 

मनपाच्या साेनवणे रुग्णालयात उपचारासाठी पाच महिन्यांची गर्भवती दाखल झाली हाेती. तिला सर्दी, खाेकला, ताप अशी लक्षणे दिसून अाल्याने तिचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयाेगशाळेत पाठवण्यात अाले हाेते. ही महिला काेराेना पाॅझिटिव्ह आढळून अाली. तिच्यावर उपचार करणारे तीन निवासी डाॅक्टर, ९ नर्सेस, एक अाया, दाेन नर्सिंग अाॅर्डर्ली, दाेन अन्य कर्मचारी अशा १७ जणांचे विलगीकरण करण्यात अाले अाहे.

सातारा जिल्ह्यात नवे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नवे ४ कोरोनाग्रस्त वाढले असून त्यात फलटण १, पाटण तालुक्यातील डेरवणच्या १० महिन्यांचा मुलगा, कराडच्या ओगलेवाडीतील रेल्वे कर्मचारी व महारुगडेवाडीच्या कोरोनाबाधित मृताच्या नातेवाइकाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर पोहोचली आहे. त्यापैकी दोघे मरण पावले असून आठ जण उपचार घेत आहेत. एक महिला कोरोनामुक्त झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...