आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:डेक्कन क्वीन रेल्वेचा 93 वा वाढदिवस जल्लोषात साजरा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजलेली डेक्कन क्वीन सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दाखल होताच तिचे बुधवारी सकाळी बँडपथकाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुणे रेल्वेस्टेशनवर केक कापून तिचा ९३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांशी या रेल्वेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. या वेळी विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे, तामिळ चित्रपटातील अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष हर्षा शहा, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ, रेल्वे पोलिस व प्रवासी उपस्थित होते. या वेळी काही प्रवाशांनी रेल्वेच्या प्रतिकृतीही आपल्यासोबत आणल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...