आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:खोटे सोने खरे असल्याचे भासवून सराफ व्यावसायिकाची फसवणूक; पुणे पोलिसांकडून महिला गजाआड

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खोटे सोने खरे असल्याचे भासवून सराफ व्यवसायिकची फसवणूक करणार्‍या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली आहे. संबधित घटना सहा मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गणेश पेठेतील एच पी. ज्वेलर्समध्ये घडली होती. याबाबत अजय सोनी (वय- 50 रा. गणेश पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गणेश पेठेतील कस्तुरे चौकात अजय सोनी यांचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. सहा मे रोजी एका महिलेने तिच्याकडील खोटे सोने ज्वेलर्समध्य दिले. ते सोने खरे असल्याचे भासवून त्याबदल्यात मंगळसूत्र खरेदीचा बळच बहाणा केला. मात्र,ही बाब ज्वेलर्सच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पोलिसांना दुकानात बोलाविले. संबंधित महिलेने यापुर्वीही तीन ते चार वेळेस अशाचप्रकारे खोटे सोने खरे असल्याचे भासवून फसवणूकीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक राहूल जोग पुढील तपास करीत आहेत.

बस प्रवासादरम्यान महिलेचे तीन लाखांचे दागिने चोरीला

पीएमपीएल बस स्थानकासह एसटी स्थानकांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेष्ठ महिला, प्रवाशी महिलांना लक्ष्य करुन त्यांच्याकडील मौल्यवान दागिने चोरी केली जात आहे. संबधित हद्दीतील पोलिसांकडून तपासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एसटी बस प्रवास करणार्‍या महिलेचे तब्बल दोन लाख 92 हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना सात मे रोजी अहमदनगर ते वाकडेवाडी एसटी प्रवासात घडली आहे. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.