आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:लम्पीचा आढावा घेऊन बैलगाडी शर्यतीचा निर्णय

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी विखे बोलत होते. विखे म्हणाले की, बैलगाडा शर्यती सुरू राहाव्यात ही शासनाची भूमिका असून त्यासाठी शासन खंबीरपणे आपली भूमिका बजावेल. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीसाठी बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ विधिज्ञांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या वतीने देण्यात येईल.

महानंद डेअरीला ऊर्जितावस्थेत आणण्यास सहकार्य : महानंद डेअरीला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठी डेअरीनेही बाजाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य दूध महासंघाच्या (महानंद) समस्यांच्या अनुषंगाने विधान भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, जिल्हा, तालुका संघांची ही मातृसंस्था सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च मोठा आहे. त्यामुळे महानंदने खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. काही कालावधीसाठी ही संस्था व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे (एनडीडीबी) देण्याबाबत विचार सुरू आहे. संस्थेच्या देणी असलेली रक्कम देता यावी यासाठी शासनाकडून १० कोटी रुपये तत्काळ दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...