आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:पुणेकरांकडून आखाड जोरात; 800 टन चिकन, दोन हजार बोकडे फस्त

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात मटन खरेदी साठी गर्दी
  • आषाढातील शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांच्या सकाळी 6 वाजेपासून दुकांनासमोर रांगा

आषाढातील शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी सकाळी ६ वाजेपासून दुकांनासमोर रांगा लावल्या होत्या. लॉकडाऊनमुळे मागणीच्या तुलनेत मटण, मासळी, चिकनची आवक कमी झाली होती. पुणेकरांनी रविवारी ३ ते ४ टन मासळी, चिकन ८०० टन आणि दीड ते दोन हजार बोकड फस्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. रविवारी आषाढातील शेवटचा रविवार असल्याने किराणा, भाजीपाल्याच्या दुकानाबरोबर मटण, मासळी आणि चिकनची दुकाने उडण्यास मुभा दिली होती.

मागणीच्या तुलनेत मटण, मासळी, चिकनचा पुरवठा कमी झाला. आखाडातील शेवटचा रविवार असल्याने मागणीत दुप्पट वाढ झाली हेाती. यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी वाढ असल्याचे माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

१९ जुलै आषाढातील शेवटचा रविवार होता. मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार करत नाहीत. त्यानंतर गणेशोत्सव असतो. गणेशोत्सवातही मांसाहार केला जात नाही. कित्येक जण दिवाळीपर्यंत मांसाहार करण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी मांसाहाराचा बेत आखला होता.

लॉकडाऊनमुळे आपल्या मटण, मासळी मिळेल की नाही चिंता असल्याने नागरिकांनी दुकानासमोर सकाळी सहा वाजेपासून रांगा लावल्या होत्या. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले. ते म्हणाले, दरवर्षी घरगुती ग्राहकांबरोबर हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकाकडून चिकनला मोठी मागणी असते. लॉकडाउनमुळे हॉटेल, खानावळ बंद आहे. रविवारी पुणे शहर पिंपरी-चिंचवडमध्ये ८०० टन चिकनची विक्री झाली. दीड ते दोन हजार हजार बोकडांची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.