आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यांवर जंगली जनावरे:दोन रानगव्यांनंतर पुण्यातील रस्त्यांवर आढळला हरणांचा कळप, वनविभागाची शोध मोहिम सुरू

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरणांचा हा कळप पुण्यातील रहिवासी परिसरात फिरताना दिसला

हरणांचा हा कळप पुण्यातील रहिवासी परिसरात फिरताना दिसला

पुण्यातील रहिवासी परिसरात जंगली जनावरे फिरण्याच्या घटना सुरुच आहेत. यापूर्वी पुण्यात दोन वेळेस रानगवा दिसला होता. यातील एका रानगव्याचा रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हरणांचा कळप शहरातील रहिवासी भागात फिरताना दिसला आहे.

पुण्यातील शिवने परिसरात मंगळवारी रस्त्यांवर काही हरिण फिरताना दिसले. यानंतर वन विभागाचे पथक या हरणांचा शोध घेत आहे. वन विभागाने या परिसरातील लोकांना आपल्या घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. हे पथक आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हरणांचा शोध घेत आहेत.

जंगलात परत गेल्याची शक्यता

अनेक तास वन विभागाने शोध घेऊनची या हरणांचा शोध लागला नाही. रात्री हा कळप परत जंगलात गेल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...