आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बदनामी:ट्विटरवरुन बदनामी केल्याने तरुणावर गुन्हा दाखल

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संर्दभात बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर लिहूून ताे ट्विट या साेशल मिडियावर प्रसारित करुन बदनामी केल्याने एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाेणीकंद पोलिसठाण्यात संदिप साेमनाथ सातव (वय-38,रा.वाघाेली,पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिल हरपळे यांचेवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराेपी अनिल हरपळे याने त्याचे ट्विटरवरुन आयडीवरुन 16 नाेव्हेंबर राेजी ‘खुर्ची मिळवली पण हाेती नव्हती ती इज्जत गमावली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र जितक्या शिव्या खातात तितक्या काेणी खात नसेल. काही वर्षात तुमचा नारायण राणे हाेईल (कुत्र विचारणार नाही तुम्हाला), असे ट्विट व त्यासाेबत जाेडलेला फाेटाे ज्यात एका वृत्त वाहिनीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटमेंट ‘तुमच्या साेबत 24 तास साेबत राहणारा, सत्ता भाेगणारा व्यक्ती खंजीर खुपसताे, माझ्यासाेबत तुम्ही बेईनामी कराल तर मी बदला नक्कीच घेईन. बेईमानाला जागा दाखवावी लागते, दाखवली. हाेय, मी बदला घेतला’ असे ट्विट केलेले ज्यावर अनिल हरपळे, 96 कुळी मराठा या ट्विटरवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फाेटाे व त्या फाेटाेवर ‘ तु राजकारणी म्हणून भिकराडा आहेसच, पण माणूस म्हणून सुध्दा साल्या निच आहेस, असे सार्वजनिक ट्विटकरुन समाजातील दाेन गटातील शांतता, एकाेपा बिघडविण्याचे उद्देशाने द्वेषाने, दुष्टाव्याच्या भावना वाढीस घालून ट्विट करुन गृहमंत्री फडणवीस यांची बदनामी केली. याबाबत पुढील तपास लाेणीकंद पोलिसकरत आहे.

ऑडी गाडीत आढळलेला मृतदेह

मुंबई-गोवा हायवेलगत नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका लाल रंगाच्या ऑडी गाडीत खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. महामार्गावरील कर्नाळा खिंड येथे शुक्रवारी (दि.18) हा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. हा मृतदेह पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील संजय कार्ले या गुन्हेगाराचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.पनवेल-पेण रोडवर असलेला तारा गावच्या हद्दीत एका लाल रंगाच्या ऑडी कारच्या (MH-14 GA 9585) बाजूस एक मृतदेह आढळून आला होता त्यामुळे खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...