आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह मजकूर:फडणवीसांची बदनामी; तरुणावर गुन्हा दाखल

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर लिहूून ताे साेशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याने एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाेणीकंद पाेलिस ठाण्यात संदीप साेमनाथ सातव (३८, रा. वाघाेली, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिल हरपळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराेपी अनिल हरपळे याने १६ नाेव्हेंबर राेजी ‘खुर्ची मिळवली, पण हाेती नव्हती ती इज्जत गमावली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र जितक्या शिव्या खातात तितक्या काेणी खात नसेल. काही वर्षांत तुमचा नारायण राणे हाेईल, असे ट्वीट करतानाच साेबत जाेडलेल्या फाेटाेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘तुमच्यासाेबत २४ तास राहणारा, सत्ता भाेगणारा व्यक्ती खंजीर खुपसताे, माझ्यासाेबत तुम्ही बेइनामी कराल तर मी बदला नक्कीच घेईन. बेइमानाला जागा दाखवावी लागते, दाखवली.

हाेय, मी बदला घेतला’ या वाक्यावर अनिल हरपळे याने अत्यंत आक्षेपार्ह असे ट्वीट केले. त्यामुळे समाजातील दाेन घटकांत असलेला एकाेपा बिघडवण्याचा प्रयत्न केला. या शिवराळ भाषेत पोस्ट करुन त्याने गृहमंत्री फडणवीस यांची बदनामी केली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हरपळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास लाेणीकंद पाेलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...