आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत ज्ञानेश्वर पालखी मार्ग सहा पॅकेजमध्ये असून १२ पालखी स्थळे आहेत, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन पॅकेजमध्ये असून दाेन्ही पालखी मार्गाचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. या मार्गावर ११ पालखी स्थळे आहेत. एक वर्षाचे आत पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. नवीन वर्षात सुरुवातीलाच पालखी मार्ग वारकऱ्यांना उपलब्ध हाेईल. आगामी तीन महिन्याचे आत ६० ते ७० टक्के काम या मार्गाचे पूर्ण हाेईल आणि डिसेंबरअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. पुढील वर्षी पालखीमार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी घाेषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
नितीन गडकरी म्हणाले, पालखी मार्गावर दुपदरी रस्ता चाैपदरी करण्यात आलेला आहे. शेवगाव येथे गजानन पालखी मार्गावर टाइल्स लावून मध्ये गवत लावण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांचे पाय भाजत नाहीत. अशाच प्रकारे या मार्गावर व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे, असेही गडकरी यांनी या वेळी सांगितले.
देहू व पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह शनिवारी हवाई पाहणी केली. सदर महामार्ग ''हरित मार्ग ''करण्यात यावा या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस - बारामती - इंदापूर - अकलुज - बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही गडकरी यांनी या वेळी बोलताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.