आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीची वारी:तुकोबाराय पालखी सोहळा प्रस्थानापासून उपमुख्यमंत्री अजित पवार दूर; सुनेत्रा पवार पोहोचल्या

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधान परिषद निवडणुकीत साेमवारी सकाळपासून व्यस्त आहेत. त्यामुळे अजित पवार यांना नियाेजित संत तुकाराम महाराज पालखी साेहळा प्रस्थान कार्यक्रमास उपस्थित राहणे अशक्य आहे. हे पाहता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देहूत कार्यक्रमासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासाेबत मावळ लाेकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, कर्जत-जामखेडचे आमदार राेहित पवार हे उपस्थित आहेत.

खराब हवामान

सकाळपासून पुणे परिसरात पाऊस पडत असल्याने हवामान याेग्य नाही. त्यामुळे मुंबईवरून पुण्यात हेलिकाॅप्टरने येऊन देहूत पालखी साेहळा प्रस्थानास उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार हाेते. मात्र, खराब हवामान आणि मुंबईतील विधान परिषद निवडणुकीत ते अडकल्याने देहूच्या पालखी साेहळयापासून ते दूरच राहिलेले दिसून आले आहे.

शेवटपर्यंत उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या उपस्थितीत नुकताच देहू येथे शिळा मंदिर लाेकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याचा आराेप करत, राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली हाेती. याबाबत राज्यभरात निर्देशने ही करण्यात आली. त्यामुळे अजित पवार देहूत साेमवारी येणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली हाेती.

बातम्या आणखी आहेत...