आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना मानसिक आधाराची गरज:लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या ऑनलाइन साहित्याच्या मागणीत दुपटीने वाढ - कैलास सत्यार्थी

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात लहान मुलांचे तस्करी, बालमजुरी,बालविवाह यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात आम्ही केलेल्या सर्व्हेनुसार डिजिटल स्वरूपात ऑनलाइन लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या साहित्याची मागणी दुपटीने वाढलेली दिसून आले आहे. देशात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार प्रत्येक तासाला 5 मुलांचे लैंगिक शोषण होते. ही बाब दुर्दैवी असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी गुरुवारी (03 ऑगस्ट) व्यक्त केले.

मानसिक आधार द्या

पुण्यातील आर्मेड मेडिकल कॉलेजच्या डायमंड ज्युबली वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सत्यार्थी म्हणाले, आपल्याकडे मुलांच्या अत्याचार प्रकरणात केसचा निकाल येण्यासाठी 12 ते 40 वर्षापर्यंत कालावधी लागतो आहे. अशा दृष्टीने मुलांना त्यांचा न्याय योग्य वेळेत मिळत नाही ही बाब समजून घेतली पाहिजे. मुलांच्या अत्याचारात पीडिताना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घटनेतून बाहेर पडण्यासाठी मानसिक आधार मिळण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे.

भविष्यात संधी

मागील चार वर्षापासून याबाबतचे बिल संसदेत प्रलंबित आहे. आझादीचा अमृत महोत्सव साजरा करताना मुलांच्या तस्करी विरोधी बाबतचा नवा स्वतंत्र कायदा पारित होणे आवश्यक आहे. बालविवाहाचा विषय गंभीर असून सरकारने मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. कमी वयात मुलींचे लग्न झाल्यानंतर त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. मुलांना त्यांचे बालपण योग्य वयात मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्याकरिता आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा नावाने एक कार्यक्रम राबवला गेला पाहिजे. देशातील नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्वीपेक्षा चांगले असून त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यास समर्थन दिले आहे. धोरणाच्या माध्यमातून मुलांना अनेक प्रकारच्या संधी भविष्यात उपलब्ध होऊ शकतील असे मत यावेळी सत्यार्थी यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...