आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्टीसाठी कायपण!:गावाहून मासे आणण्यासाठी मागितली वरिष्ठांकडे रजा; पुण्यातल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्राची एकच चर्चा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काम म्हटले की ताण येतो. मग हा ताण घालवण्यासाठी सुट्टीही हवी असते. आजारपण, लग्नसमारंभ तसेच खासगी कारणांसाठी सुटीची मागणी केली जाते. मात्र ब-याचदा वरिष्ठांकडे केलेले सुट्टीची मागणी ही पूर्ण होईल याची खात्री नसते. यामुळे सुट्ट्यांसाठी शक्कल लढवली जाते. असेच एक सुट्टीचे पत्र पुण्यात गुरुवारी व्हायरल झाले. एका पोलिस कर्मचाऱ्याने हे पत्र लिहिले असून, त्याने चक्क गावावरून मासे आणण्यासाठी वरिष्ठांकडे सुट्टीची मागणी केली आहे.

पुण्यातील खडक पोलिस ठाण्यातील एस. डी. शिंदे या कर्मचाऱ्याने हे पत्र लिहिले आहे. शिंदे यांना आपले मित्र आणि सहकाऱ्यांसाठी गावावरून चिलापी आणि रव मासे आणायचे आहेत, असे कारण देत सुट्टीसाठी विनंती अर्ज केला आहे. शिंदे यांना 2 दिवसांची सुट्टी हवी आहे. त्यांनी हे पत्र त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले आहे. दरम्यान, हे पत्र वरिष्ठांच्या हाती आधी पडण्याऐवजी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे या पत्राची आज सकाळपासून चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, सुट्टीच्या मागणीचे हे पत्र अद्याप मिळाले नसल्याचे शिंदे यांच्या वरिष्ठांनी सांगितले आहे.

शिंदे यांनी पत्रात साप्ताहिक सुट्टीला जोडून एक दिवसांची आणखी सुटट्टी द्यावी, अशी मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वाशिंबे या माझ्या गावावरुन मला चिलापी आणि रव मासे आणायचे आहेत. त्यामुळे २९ आणि ३० मेरोजी मुख्यालय सोडण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात चिलापी मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात. या सोबतच जलाशयातील रव तसेच विविध जातीचे मासेही प्रसिद्ध आहेत. या माशांवर ताव मारण्यासाठी अनेक खवय्ये पुण्यातील भिगवण परिसरात जात असतात. दरम्यान, आपल्या सहका-यांची मागणी करण्यासाठी या कर्मचाऱ्याने थेट सुटट्टीची मागणी केल्याने त्याचे हे पत्र समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...