आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पुण्यात जीवे मारण्याची धमकी देत मसाला व्यापाऱ्याला मागितली 40 लाखांची खंडणी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मसाले व्यापार्‍याच्या पत्नी, मुलांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत 40 लाखांची खंडणी मागणार्‍या अज्ञातावर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड येथील एका 37 वर्षीय मसाले व्यापार्‍याने फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी हे बिबवेवाडी परिसरात त्यांची पत्नी, मुलगी व मुलासह राहण्यास आहेत. त्यांचा कात्रज येथे मसाल्याचा कारखाना आहे. 1 जून रोजी ते त्यांच्या कारखान्यातून घरी येत होते. यावेळी त्यांना मार्केटयार्ड येथे असताना त्यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने त्यांना धमकावत तुला बायको, मुलगी अणि मुलगा असे आहेत. त्यांच्या जीवाची सलामती पाहिजे असल्यास 40 लाख रूपये कात्रज घाटात पुलाखाली आणून दे, नाही तर पत्नीला आणि मुलांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्यची धमकी दिली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...