आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफजल खानाची कबरच काढून टाका:हिंदु महासभेची मागणी, शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्याची कबर पाहिजे कशाला?- आनंद दवे

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खान याची कबरच राज्य सरकारने काढून टाकावी. तसेच, औरंगजेबाची कबरही हटवावी, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

सरकारचे मानले आभार

आज पहाटे 4 वाजेपासूनच अफजल खानाजवळील अनधिकृत बांधकम शासनाकडून पाडण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, सरकार कबरीच्या जवळील अनधिकृत बांधकाम हटवत आहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. मात्र शासनाने एवढ्यावरच न थांबता अफजल खानाची कबरच काढून टाकावी.

कबर हवी कशाला?

आनंद दवे म्हणाले, केवळ अफजल खानच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड त्रास देणाऱ्या औरंगजेबाची कबरही उद्धवस्त करावी, अशी आमची मागणी आहे. या राक्षसांचे दैवतीकरण करण्याचे काम काही स्वराज्यातील कंटकच करत आहे. या राक्षसांनी छत्रपती शिवाजी महाराजांना, हिंदूना प्रचंड त्रास दिला. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या कबरी नकोत. सरकारला त्यांची कबर पाडता येत नसेल तर हिंदू महासभा ते काम करेल, असा इशाराही आनंद दवे यांनी दिला.

द्वेष कमी झाला नाही

आनंद दवे म्हणाले, स्वराज्यावर हल्ले करणाऱ्यांचे काय हाल होतात हे पुढच्या पिढीला कळावे, यासाठीच शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफलज खानाची कबर बांधली. मात्र, काही जणांनी यावरुन शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचे पाप केले. अफजल खानच्या काही भक्तांकडून असे प्रयत्न करण्यात आले. अफजल खानाच्या वधानंतर साडेतीनशे वर्षांनंतरही हिंदुस्थानविरोधातील त्यांचा द्वेष कमी झालेला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कबरीच उद्धवस्त केल्या पाहीजेत.

बॅनरवरुन इशारा

आनंद दवे म्हणाले, आज शिवप्रताप दिन आहे. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. हिंदूची दिवाळीची सुरुवात इथूनच झाली. त्यामुळे आज हिंदु महासभेतर्फे सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पुण्यात काही ठिकाणी लावलेल्या बॅनरवर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, हे बॅनर आम्ही काढणार नाही. बॅनर काढल्यास हिंदू महासभेतर्फे आंदोलन केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...