आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण:सोमवारी देहूतून पालखी पंढरीकडे ठेवणार प्रस्थान

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्ग संकटामुळे दोन वर्षे लागोपाठ आषाढी वारीला वंचित झालेल्या वारकऱ्यांना यंदा मोठ्या संख्येने आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू येथे गर्दी केली आहे. सोमवारी दुपारी देहू नगरीत पारंपारिक पद्धतीने सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडून तुकोबांचा पालखी सोहळा देहू येथून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, सोमवारी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुका चांदीच्या सिंहासनावर प्रस्थापित करून रथात ठेवण्यात येतील, आणि प्रस्थान सोहळा सुरू होईल, अशी माहिती देहू संस्थानचे प्रमुख विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली.

यंदा दोन वर्षांनंतर आषाढी वारी परंपरेनुसार पायी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे वारकर्यांमध्येही उत्साह अधिक आहे. भाविकांची संख्याही यंदा जास्त आहे. तीनशेपेक्षा अधिक दिंड्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. देहू संस्थानचे सर्व पदाधिकारी सोहळ्याच्या तयारीत असून, शासन आणि प्रशासनाचेही मोठे सहकार्य मिळत आहे. देहू येथे आलेल्या आणि येणार्या भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वीज, पाणी, स्वच्छतागृहे तसेच निवास व्यवस्था केली आहे. आवश्यक तो पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे, असे मोरे म्हणाले.

प्रशासनाच्या वतीने आषाढी वारीसाठी अनेक पातळ्यांवर तयारी करण्यात आली आहे. वारीदरम्यान आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहेत. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 4 हजार पोलिस बंदोबस्ताच्या कामावर नेमण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...