आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान...

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाळ-मृदंगाचा निनाद आणि वीणेकरी, झांजकरी, ध्वजकरी यांच्या मुखातून अखंड होणारा ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खा. श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती होती.

प्रशासनाची तयारी
आषाढी वारीसाठी प्रशासकीय पातळीवर मोठी व्यवस्था उभारण्यात आली आहे. देहू येथे तब्बल ८०० स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. शासनाच्या ‘निर्मल वारी’ उपक्रमांतर्गत ही व्यवस्था आहे. विजेची अतिरिक्त सोय देण्यात आली आहे. तंबूंमधून निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...