आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाईन गे माये तया पंढरपुरा...!:लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहू येथून संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी देहू येथून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवले. यावेळी हजारो भाविकांनी ज्ञानोबा-तुकोरामांचा जयघोष केला. यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कारणामुळे पालखी सोहळा झाला नाही. मात्र, यंदा रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखीने लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवले.

विठू नामाचा गजर

श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानावेळी लाखो वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर केला. खांद्यावर भगवी पताका, पांढरा शुभ्र सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घातलेल्या लाखो वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर केला. यावेळी अवघे वातावरण भक्तमय झाल्याचे पाहायला मिळाले.

कडेकोट बंदोबस्त

तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 337 वे वर्ष आहे. वारकऱ्यांनी केलेला हरिनामाचा गजर आणि भागवत धर्माच्या फडकणाऱ्या पताकांनी सारा माहोल पालटला आहे. मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

सीसीटीव्हीची नजर

पालखी प्रस्थानापूर्वीची संत तुकाराम महाराज संस्थानने मंदिर परिसरातील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यातही कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. कुठेही घातपातची घटना घडणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

चोख पोलिस बंदोबस्त

अमिताभ गुप्ता
अमिताभ गुप्ता

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषद देत पालखी मार्गावरील बंदोबस्ताची माहिती दिली. यावेळी सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त ए. राजा, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे उपस्थित होते. यावेळी गुप्ता म्हणाले की, म्हणाले, पालखी मार्ग व मार्गावरील विशिष्ट ठिकाणांवर पुणे शहर पोलिस आयुक्तालयाने पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पाणी करून बंदोबस्तावर ठेवला आहे. संपूर्ण पालखी मार्ग ठिकाणांची बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत.

पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्त

  • पुणे शहरातील 2 अपर पोलिस आयुक्त
  • 9 पोलिस उपायुक्त,
  • 19 सहाय्यक पोलिस आयुक्त
  • 103 पोलिस निरीक्षक
  • 307 सहायक पोलिस निरीक्षक/ पोलिस उपनिरीक्षक
  • 3406 पोलिस अंमलदार
  • 1 एसआरपीएफ कंपनी
  • 600 होमगार्ड
बातम्या आणखी आहेत...