आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाईंमुळेच महिलांना समाजामध्ये स्थान:उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजही समाजात मुलींवर अत्याचार, बालविवाह, मुलींना शाळेत न घालणे असे अनेक प्रकार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस (सुरक्षित आवार) या संकल्पनेवर काम होण्याची आवश्यकता दिसून येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून या पदावर काम करताना एक आठवण नेहमी होते की, सावित्रीबाई फुले यांच्या कामामुळेच आम्ही इथवर पोचलो आहोत. अनेक महिलांना समाजात पुढे येऊन विकासाची संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आम्ही आज वंदन करीत आहोत, असे प्रतिपादन पुण्यात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या १०९ व्या जयंती निमित्त पुण्यातील सारसबागेसमोरील पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्या म्हणाल्या, ऐतिहासिक भिडे वाड्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या सुधारणा केल्यास अधिक उत्तम होईल. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात याविषयी मुद्दा उपस्थित झाला असताना याबाबत उच्च व तंत्रशिक्षण आणि शिक्षण विभागाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे मान्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...