आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार-राणे वाक् युद्ध:अज्ञानी आहेत म्हणणाऱ्या नारायण राणेंना अजित पवारांचे उत्तर, म्हणाले - 'त्याचे त्यांना लखलाभ, आम्हाला आमचे सरकार चालवायचे आहे'

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवार अजून अज्ञानी आहेत. आपल्या खात्याचे बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही अशी टीका राणेंनी केली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले यानंतर त्यांचा अटक आणि जामिन असे चित्र पाहायला मिळाले. यानंतर पासून अजित पवार सातत्याने महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. शिवसेनेसोबतच त्यांनी आता राष्ट्रवादीवरही टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजित पवारही त्यांना जशास तसे उत्तर देताना दिसत आहेत.

अजित पवार अजून अज्ञानी आहेत. आपल्या खात्याचे बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही अशी टीका राणेंनी केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जशास तसे उत्तर दिले आहे. पुण्यात प्रसारमाध्यामंसोबत संवाद साधताना अजित पवारांनी राणेंच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांनी काय दिले उत्तर ?
अज्ञानी म्हणाणाऱ्या राणेंना प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले की, 'मला या गोष्टीवर जास्त चर्चाच करायची नाहीये. त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला आमचे सरकार व्यवस्थितरित्या चालवायचे आहे. ते आम्ही चालवत देखील आहोत. ते केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्यांनी त्यांचे केंद्राचे काम करावे आणि आम्ही आमचे राज्याचे काम करतो,'

काय म्हणाले होते नारायण राणे?
‘अजून अजित पवार अज्ञानी आहे. त्यांनी आपले खाते सांभाळावे. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप आणि केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार यांच्याकडून शिकावं.’अशी टीका नारायण राणेंनी केली होती.

दरम्यान अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या खात्यावर टीका केली होती. सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर उत्तर देत असताना राणेंनी आज पवार अज्ञानी असल्याची टीका केली होती. यावरच पवारांनी उत्तर दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...