आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरेगाव भीमा:विजयस्तंभास पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागच्या सरकारने जो निधी मंजूर केला होता तो अद्यापही आलेला नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दाखल झाले. त्यांनी येथील विजयस्तंभाला अभिवादन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र शौर्याची भूमी आहे. विजयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला देण्यात येईल. मागच्या सरकारने जो निधी मंजूर केला होता तो अद्यापही आलेला नाही. मात्र एकमेकांवर ढकलून चालणार नसल्याचेही पवार म्हणाले आहेत.

आज सकाळी अजित पवार हे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ येथे दाखल झाले. त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. यासोबतच कोरोनाचे संकट असल्यामुळे घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करण्याचे आवाहान नागरिकांना केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत आहे. सगळीकडे व्यवस्थित बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी सर्वांनी कोरोना काळात सुरक्षितता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...