आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सकाळी सहा वाजता पुणे मेट्रो कामाची पाहणी, संत तुकाराम नगरहून मेट्रोने केला प्रवास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संत तुकाराम नगरला मेट्रोचे तिकीट घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रो प्रवास केला.

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आज पहाटे सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाची पहाणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी अजित पवारांनी सर्व कामाची पाहणी केली यासोबतच संत तुकाराम नगर ते एचए कंपनपर्यंत त्यांनी प्रवासही केला.

अजित पवार हे वेळेचे पक्के आहेत. नियोजित वेळेत ते कामाच्या ठिकाणी हजर होत असतात. आजही पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी अगदी वेळेत हजर झाले. पहाटे सहा वाजताच ते फुगेवाडीला दाखल झालेले होते. पहाटेच सर्व अधिकारी आणि कर्मचारीही कामाच्या ठिकाणी हजर झाले होते.

पाहणी करुन घेतली बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. संपूर्ण कामाची पाहणी केली. यासोबत ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. यानंतर ते संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे रवाना झाले. तिथे त्यांनी मेट्रो स्टेशनची पाहणी केली.

भल्या पहाटे केला मेट्रोने प्रवास
अजित पवारांनी यावेळी स्टेशनवरील सर्व प्रक्रियांची पाहणी केली. तसेच संत तुकाराम नगरला मेट्रोचे तिकीट घेऊन त्यांनी मेट्रो प्रवास केला. अजित पवार मेट्रोचालकाच्या केबिनमधून आढावा घेतला. यावेळी ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोविषयी माहिती देत होते.

दरम्यान अजित पवार आज पुण्यातील कोरोना परिस्थितीच आढावा घेण्यासाठी आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. यामुळे पुण्यातील या परिस्थितीवर पालकमंत्री म्हणून अजित पवार विशेष लक्ष देत आहेत.