आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड:जंबो कोविड सेंटरची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, सेंटरमध्ये 616 ऑक्सिजन बेड आणि 200 आयसीयू बेड असणार

पुणे3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 3 जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील अन्ना साहेब मगर स्टेडियमध्ये बनवण्यात आलेल्या जंबो रुग्णालयाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. हे पाहता रुग्णांना चांगली सुविधा आणि ट्रिटमेंट मिळावी यासाठी जंबो कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.

या सेंटरमध्ये 616 अद्यावत ऑक्सिजन बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत. शहरातील इतर सरकार रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड कमी पडत आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3 जंबो कोविड सेंटरची निर्मिती केली जात असल्याचे म्हटले. अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान जिल्ह्याधिकारी राम नवलकिशोर, पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त श्रावण हार्डीकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.