आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची बातमी:पुण्यात पुन्हा लागू होणार विकेंड लॉकडाऊन, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा बैठकीनंतर केली घोषणा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अजून कठोर निर्बंध लावण्याचा इशाराही पुणेकरांना दिला आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शनिवार आणि रविवार सर्व दुकाने बंद राहणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटकांच्या गर्दीला चाप लावण्यासाठी जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.

अजित पवारांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अजून कठोर निर्बंध लावण्याचा इशाराही पुणेकरांना दिला आहे. यासोबतच विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच पर्यटनस्थळांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शनिवार आणि रविवारी सर्व बंद राहणार आहे. यामुळे केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू असणार आहे असे पालकमंत्र्यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...